नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारी टीका यापुढं खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलाय.
भाजप हा लाचारांचा पक्ष नाही, त्यामुळं भविष्यात शिवसेनेकडून मान मिळाला नाही तरी चालेल. मात्र, अपमान सहन करून घेतला जाणार नाही, असं नितीन गडकरींनी ठणकावून सांगितलं.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, जागतिक पातळीवरही त्यांचा सन्मान केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत शिवसेनेकडून त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली जात आहे. ही गोष्ट भाजपच्या कार्यकर्त्यांना आजिबात आवडली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.