सुटी

'ती' मज्जा करण्यासाठी हेडमास्तरने चक्क शाळेला दिली सुटी

दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.

Aug 21, 2015, 12:05 PM IST

बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी

बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ही सुटी लागू होणार आहे.

Aug 21, 2015, 10:57 AM IST

७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सुटी जाहीर नाही!

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, कलाम यांच्या निधनानंतर आज कोणतीही सुटी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.

Jul 28, 2015, 09:40 AM IST

स्टेट बँकेचं कामकाज शनिवारी २ तास जास्त चालणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.

Apr 1, 2015, 04:30 PM IST

सावधान ! मार्च एण्डमध्ये सुट्टयांचा तेरावा माहिना

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुट्ट्यांचा असल्यामुळे बँकेचे व्यवहार करायचे असतील तर नागरिकांनी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी 27 मार्चपर्यंत उरकून घ्यावेत.

Mar 17, 2015, 11:43 PM IST

'मुंबई'तल्या टॅक्सी चालकांच्या 'पुणे'री मागण्या

 मुंबईतील टॅक्सी चालकांनी आपल्याला जेवणासाठी दुपारी १ ते २ दरम्यान टॅक्सी बंद ठेवण्याची सूट असावी, घरी परततांना आपल्या घराकडे जाणारी भाडी असावीत, थोडक्यात त्यांना भाडी नाकारण्य़ाचा अधिकार असावा, मात्र मुंबईचे टॅक्सी चालक दुपारी जेवणासाठी एक तासाची सूट मागतायत. यावरून ते पुण्यातून चुकून मुंबईत आले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वामकुक्षी घेण्याइतका कमी वेग मुंबई शहराचा नाही हे त्यांना कोण समजावणार?

Dec 8, 2014, 12:18 PM IST

संजय दत्तकडून आणखी महिनाभर सुटीसाठी अर्ज

अभिनेता संजय दत्तने आणखी महिनाभर सुट्टी वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. संजय दत्त सध्या पॅरोलवर येरवडा जेलमधून घरी आला आहे.

Jan 11, 2014, 09:20 AM IST

मनसेच्या इशाऱ्यानंतर इंग्रजी शाळा नरमल्या!

काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलीय. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली आहे.

Sep 7, 2013, 03:00 PM IST