ह्रदयांतर

ऐश्वर्याच्या उपस्थितीत ह्रदयांतर सिनेमाचं म्युझिक लॉन्च

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या खास उपस्थितीत ह्रदयांतर या मराठी सिनेमाचा म्युझिक लॉन्चिंगचा सोहळा मुंबईत पार पडला. विक्रम फडणीस दिग्दर्शित या सिनेमात मुक्ता बर्वे, सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहेत. यावेळी गायकांनी परफॉर्मन्स सादर केले. तर विक्रम फडणीस हा माणूस म्हणून छान आहेच, मात्र त्याचबरोबर कामाप्रती तो करीत असलेली मेहनत आपल्याला अधिक भावते असं सांगत ऐश्वर्याने विक्रम फडणीसला या फिल्मसाठी शुभेच्छा दिल्या. 

Jun 11, 2017, 02:35 PM IST