almonds

चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!

मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

Dec 25, 2013, 08:41 PM IST

मासे आणि बदाम, देती कँसरपासून आराम

मासे तसंच बदाम खाल्यास कँसर धोका कमी होतो, असा नवा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कारण, या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतं. कँसर पहिल्या पातळीवर असेल, तर हे अ‍ॅसिड कँसर रोखून धरतं.

Apr 16, 2012, 08:09 AM IST

व्हायचं असेल रोड, तर खा बदाम किंवा अक्रोड

जाडेपणा नको असेल तर रोज थोड्या प्रमाणात सुका मेवा खा. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की रोज २८ ग्रॅम कच्चे, साल न काढलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास चरबी वाढत नाही.

Nov 7, 2011, 11:08 AM IST