केंद्र सरकारचं 2 सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास पार्लमेंट्री लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक फंडाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी सातच्या सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
Jan 30, 2017, 09:52 AM ISTसेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या 15 टक्के दरानं आकरला जाणारा सेवा कर 16 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विमानप्रवास, हॉटेलिंग, फोन बिलं या आणि अशा अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी महागण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 09:31 AM IST