नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास पार्लमेंट्री लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक फंडाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी सातच्या सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
31 जानेवारीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसद भवनामध्ये अभिभाषण करणार आहेत. याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर होण्याची शक्यता आहे. प्रथमच एक फेब्रुवारीला सर्वसाधारण बजेट सोबत रेल्वेबजेटही सादर होणार आहे.