आमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली
आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.
Aug 9, 2013, 12:29 PM ISTअधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.
Mar 31, 2013, 05:58 PM ISTसूर्यवंशींचं निलंबन सूडापोटी! वाय पी सिंग यांचा आरोप
पीएसआय सचिन सूर्यवंशीवरील कारवाई सुडापोटी झाल्याची टीका माजी आयपीएस अधिकारी वाय पी. सिंह यांनी केली आहे. तसंच प्रामाणिक अधिका-यावर कारवाई कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Mar 25, 2013, 07:22 PM ISTखाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.
Mar 24, 2013, 07:08 PM ISTकुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.
Mar 20, 2013, 04:31 PM IST