samana

गुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.

May 2, 2014, 04:10 PM IST

मोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे

गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो

May 1, 2014, 05:46 PM IST

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही- उद्धव

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Mar 31, 2014, 11:11 AM IST

‘ठाकरे उत्सव’ - शिवसेनाप्रमुखांचे विविध पैलू उलगडले!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन नुकताच झाला. जुने शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी आणि किस्से जाणतात. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे ठाकरे उत्सव...

Nov 20, 2013, 12:03 PM IST

सामनामध्ये युवराजांचं कौतुक, मोदींना टोला!

राहुल गांधींनी इंदूरच्या सभेत मुजफ्फरनगर संदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे, असा चिमटा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आलीये.

Oct 28, 2013, 12:58 PM IST

पंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगपाखड केलीय. पैसे झाडाला लागत नाहीत पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत त्याचे काय ? असा सवाल बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केलाय.

Sep 24, 2012, 11:57 AM IST

मराठवाडा नवा पाकिस्तान - बाळासाहेब ठाकरे

मराठवाडा हा नव्याने पाकिस्तानची कास धरत आहे. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी लष्कर ए तैय्यबा हस्तक अबू जिंदाल तथा अबू हामजा हा मराठवाड्यातील आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

Jun 28, 2012, 09:21 AM IST