shidhudurg

कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी

 रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

Jul 15, 2014, 12:53 PM IST

सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिकमध्ये सेनेत धुसफूस

सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.

Jan 8, 2013, 03:20 PM IST

कोकणात संततधार; रेल्वे चार तास उशिराने

कोकण रेल्वेला जोरदार पावसाचा फटका बसला. मात्र, लांजा ते आडवली दरम्यान कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक चार तासान उशिराने धावत आहे. कोकणमध्ये संततधार पाऊस सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मालवण येथे माड कोसळून एक जण जखमी झाला.

Jun 18, 2012, 10:23 AM IST

आंगणेवाडीत लाखो भाविक दाखल

कोकणातल्या प्रसिद्ध अशा आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आज आंगणेवाडीत भक्तीचा महापूर लोटला. सालाबादप्रमाणे यंदाही आंगणेवाडीची यात्रा भगव्या वातावरणात फुलून गेली आहे. मात्र मुंबई ठाण्यातल्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकारणी नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीला येतायत. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आंगणेवाडीत राजकारण्यांची जत्राच भरणार आहे.

Feb 25, 2012, 02:16 PM IST

लक्झरी अपघातात 32 जखमी

लक्झरी बस सिंधुदुर्गातील कणकवलीजवळ गड नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. यात 32 प्रवासी जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Nov 29, 2011, 10:55 AM IST