starring praveen tarde

प्रवीण तरडे यांची भूमिका असलेला "लॉकडाऊन लग्न" ८ मार्चला चित्रपटगृहात

दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा  सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता "लॉकडाऊन लग्न" या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.  प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.   

Jan 9, 2024, 08:59 PM IST