vasai

काळ्याजादूच्या नावानं ‘त्याचा’ अमानुष छळ, ‘ती’ फरार!

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्यसरकारकारनं अंधश्रद्धा विरोधी कायदा पास केला असतानाही वसईत काळ्याजादूच्या नावाखाली एका तरुणाचा अतोनात छळ करण्यात आलाय.

Nov 12, 2013, 04:33 PM IST

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी

वसईतल्या खड्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्यातल्या खड्यात पडून या महिलेचा मृत्यू झालाय.

Jul 23, 2013, 09:32 AM IST

वसईकरांचा 'जीव' खड्ड्यात!

वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...

Jul 22, 2013, 07:11 PM IST

केबलचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

वसईत इलेक्ट्रिक केबलचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुमित जाधव असं या मुलीचं नाव आहे. वसईच्या सनसिटी ग्लास रोडलगतच्या नाल्यात ही दुर्घटना घडली आहे.

Oct 28, 2012, 05:54 PM IST

वसईमध्ये स्फोट; ४ जण जखमी

वसईतल्या बाभोळा परिसरात संशयास्पद वस्तूचा स्फोट झालाय. या स्फोटात चार जण जखमी झालेत. बाटलीतल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यामागं कोणताही घातपात नसल्याचा पोलिसांनी निर्वाळा दिलाय.

Jul 10, 2012, 11:00 AM IST

वसईत भीषण अपघात, ३ ठार

वसईत ट्रक आणि इंडिका कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. वसईच्या सातिवली खिंडीत बाफणा परिसरातून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला.

May 27, 2012, 12:08 PM IST

वसईत कार्निव्हलची धुम

मुंबईजवळच्या वसईत सध्या ख्रिसमस कार्निवलची धूम आहे. पारंपारिक पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्निवलमध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहारातल्या गावातल्या प्रत्येक गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.

Dec 24, 2011, 11:21 PM IST

रिक्षाचालकाला सावकाराची मारहाण

वसईत सावकारी कर्जातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. तुलसीराम यादव असं या रिक्षाचालकाचं नाव असून, झेंडाबाजार परिसरात या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली.

Dec 1, 2011, 12:00 PM IST

निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश

वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला . त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.

Nov 23, 2011, 02:12 PM IST