गंगाखेड साखर कारखाना

गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती

गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती

Jul 12, 2017, 08:18 PM IST

गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती

'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.

Jul 12, 2017, 07:25 PM IST

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई

गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 

Jul 11, 2017, 10:21 AM IST

मृत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे खाल्ले लोणी...

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटी रुपये पिक कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड शुगर एन्ड एनर्जीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या या कारखान्याने जिवंत तर सोडाच मृत शेतकऱ्यांच्या नावेही कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती झी मिडियाच्या हाती आली आहे. गुट्टे यांनी शेतकऱ्यांना कसे लुटले आहे त्याचा हा पर्दाफाश...

Jul 7, 2017, 07:22 PM IST

शेतकऱ्यांचे नावे परस्पर उचलले पीक कर्ज, केला ३८० कोटींचा घोटाळा...

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पिक कर्ज उचलून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड येथे उघडकीस आलाय. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सहा राष्ट्रीय कृत बँकेच्या अधिका-यांना हाताशी धरून गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याने 8 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या नावे 380 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. याप्रकरणाची कागदपत्रे झी मिडियाच्या हाती लागली असून त्यातून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक समोर आलीय. 

Jul 6, 2017, 07:11 PM IST