परिक्षणात नापास

नेपाळमध्ये पतंजलीची ६ औषधे परिक्षणात नापास

नेपाळच्या औषधे रेग्युलेटरने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची ६ आयुर्वेदिक औषधांना परिक्षण केल्यानंतर नापास केलं आहे. ही औषधे परत घेऊन जाण्य़ास सांगितले आहे. औषधे प्रशासन विभागाने एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं की, उतराखंडमधील दिव्य फार्मसीमध्ये बनलेली ६ औषधे ही परिक्षणात नापास झाली आहे. सूक्ष्मजीव संबंधी परिक्षणामुळे जी औषधे निकृष्ठ दर्जाची आढळली. ज्यामध्ये पतंजलीचे आवळा चूर्ण, दिव्य गसार चूर्ण, बहुची चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अगंधा आणि अद्वेय चूर्ण यांचा समावेश आहे.

Jun 23, 2017, 11:04 AM IST