महिंद्रा स्कॉर्पिओचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच

महिंद्रा अँड महिंद्राने भारतात आज महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूवीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केली आहे. 

Updated: Nov 14, 2017, 05:35 PM IST
महिंद्रा स्कॉर्पिओचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच  title=

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राने भारतात आज महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूवीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केली आहे. 

नवी दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत ही ९ लाख ९७ हजार इतकी आहे. भारतात या गाडीचा मुकाबला टाटा सफारी स्टार्मसोबत होणार आहे. महिंद्रा स्कॉर्पिओचे हे मॉडेल ७,८ आणि ९ सीटर मध्ये उपलब्ध असणार आहे. जुन्या मॉडेलपेक्षा नवीन मॉडेलमध्ये अधिक बदलाव करण्यात आले आहे. तसेच या स्कॉर्पिओमध्ये इंजिन पावर वाढवण्यात आली आहे. 

महिंद्राने या वेरियंट्सचे नाव रिवाइज केले असून हे वेरियंट्स ५ रुपात उपलब्ध आहे. एस ३, एस ४, एस ५, एस ७ आणि एस ११ असून यामध्ये टॉप एंड मॉडेल देखील उपलब्ध आहे. जे ४ वील ड्राइव सिस्टममध्ये असेल. टॉप मॉडेलची किंमत १६.०१ लाख रुपये आहे. 

महिंद्राने स्कार्पिओमध्ये २.२ लीटर mHawk डिझेल इंजिन आहे.  व्हिजुअली बघायला गेलं तर स्कॉर्पिओला जास्त स्टाइलिस्ट करण्यात आलेले नाही. अपफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रेडिएटर गिल देण्यात आले आहे. यामध्ये आता ७ स्लॉट ग्रिल देण्यात आले आहेत. बम्परला बदलले असून हँडललॅम्प्स आणि फॉगलॅम्प्स देखील मोठे करण्यात आले आहे. महिंद्रा आता फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही बम्परवरती स्डि प्लेड देखील ऑफर करत आहे. 

महिंद्रा स्कॉर्पिओ आता या रंगात उपलब्ध 

प्रीमिअम पर्ल वाइट 
डायमंड वाइट 
नपोली ब्लॅक 
सिल्वर 
मोल्टन रेड