मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. 

Updated: Dec 23, 2022, 12:22 PM IST
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans  title=
Airtel and Jio Might Increase data plans rates in India

Airtel and Jio Might Increase Its Tariff Plans : हातात नुसता मोबाईल असून, काम होत नसतं. तर, मोबाईलमध्ये डेटा पॅक असणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण, त्याशिवाय अनेक कामं मार्गीच लागत नाहीत. थोडक्यात मोबाईलमुळं अनेक कामं आणि जगणंच सुकर होत असलं तरीपण, प्रत्येक वेळी हा मोबाईलच खर्चात भर टाकण्यामागचं मुख्य कारण ठरतो. एकाएकी महागाई आणि मोबाईल डेटाच्या (Mobile data plans) दरांकडे लक्ष वेधलं जाण्याचं कारण ठरत आहे या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची भविष्यासाठीची एकंदर प्लानिंग. 

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. यामध्येच आता कंपन्यांकडून Tarrif Plans च्या दरात बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. ज्यामुळं मोबाईल वापरणाऱ्यांचा व्याप वाढू शकतो. 

किती फरकानं वाढणार Data Pack 

Analysts जेफरीजच्या माहितीनुसार येत्या काळात मोबाईल वापरणाऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. कारण, टेलिकॉम कंपन्यांकडून या दरांमध्ये किमान 10 टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. एअरटेल आणि जिओनं 2023 ते 2025 च्या चौथ्या तिमाहीत ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेव्हेन्यू आणि मार्जिनवर असणारा दबाव पाहता टेलिकॉम कंपन्या दरवाढ करू शकतात असं सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block

तिथे एअरटेलनं यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निर्णय घेत अनेक ठिकाणहून त्यांचा 99 रुपयांचा पॅक हटवला आहे. या दरवाढीचे परिणाम पाहता सदर कंपन्यांच्या सेवा घेणाऱ्या युजर्सची कमी होणारी संख्या आणखी मोठ्या फरकानं वाढू शकते. 

TRAI नं ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार Vodafone Idea च्या उपभोक्त्यांची संख्या 3.5 मिलियन इतक्या फरकानं कमी झाली होती. तर, io आणि Airtel नं मात्र 2.2 मिलियन इतक्या नव्या युजर्सना आकर्षित केलं होतं.