जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं आणले नवे प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलनं नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. 

Updated: Oct 2, 2017, 06:22 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं आणले नवे प्लॅन title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलनं नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 4GB 3G/4G इंटरनेट डेटा मिळणार आहे. २८ दिवसांसाठीचा हा प्लॅन असून यामध्ये अनलिमिटेट लोकल आणि एसटीडी कॉल असणार आहेत.

याचबरोबर एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी 1GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल मिळणार आहेत. तर ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी २८GB डेटा (प्रत्येक दिवसासाठी जास्तीत जास्त १GB डेटा) आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.