Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का; प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. 

Updated: Jun 17, 2022, 08:15 PM IST
 Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का; प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या title=

मुंबई : टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता अतिरीक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. 

एअरटेलने गेल्या वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढवली होती. त्यानंतर आता आपल्या पोस्टपेड प्लॅनची किंमतही वाढवली आहे. एअरटेलने एक नवीन प्लॅन सादर केला आहे. 1199 रुपयांचा हा प्लॅन आहे. हा प्लॅन 999 रुपयांसारख्याचं प्लॅन सारखी सेवा देतोय. मात्र नवीन प्लॅनची किंमत जास्त आहे.  

1199 रुपयाच्या प्लॅनमध्ये काय ?
एअरटेलच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनप्रमाणेच यामध्ये सेवा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये 150GB महिन्याला डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये आणखीण दोन कनेक्शनही जोडता येणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. ही सुविधा दोन्ही अॅड-ऑन वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध असेल. दररोज १०० एसएमएस मिळत आहेत. 

यूजर्सला एअरटेल थँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड मिळेल. म्हणजेच, या प्लॅनसह, ग्राहकाला Netflix चे मूळ मासिक सबस्क्रिप्शन, Amazon Prime चे 6 महिने सदस्यत्व आणि Disney Plus Hotstar मोबाईल प्लान एक वर्षासाठी मिळेल.यामध्ये Wink Music Premium चे सबस्क्रिप्शन मिळेल. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, या सर्व सुविधा आधी ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होत्या.

९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय ? 
जर तुम्ही 999 रुपयांचा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 100 GB डेटा मिळेल. यामध्ये तुम्हाला प्रत्येक अॅड-ऑनसाठी 30GB डेटा मिळेल. वापरकर्त्यांना दररोज 200GB डेटा रोलओव्हर, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये Airtel Thanks Platinum हा पर्यायही उपलब्ध असेल. तुम्ही या प्लॅनमध्ये दोन वापरकर्ते जोडू शकता.