आयफोनचा नवीन लूक भारतात होणार लॉन्च

आयफोन SE चा नविन लूक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयफोन SE हा पहिल्यांदाच भारतात लॉन्च केला जाणार आहे. आयफोन SE चे सर्वांत मोठे उत्पादन हे भारतातच असणार आहे. विस्ट्रॉनने या फोनचे मॅन्यूफॅक्चर केले आहे. २०१८ मध्ये कंपनी या स्मार्टफोनचा सप्लाय भारतात सुरू करणार आहे.

Updated: Aug 8, 2017, 11:51 AM IST
आयफोनचा नवीन लूक भारतात होणार लॉन्च title=

मुंबई : आयफोन SE चा नविन लूक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयफोन SE हा पहिल्यांदाच भारतात लॉन्च केला जाणार आहे. आयफोन SE चे सर्वांत मोठे उत्पादन हे भारतातच असणार आहे. विस्ट्रॉनने या फोनचे मॅन्यूफॅक्चर केले आहे. २०१८ मध्ये कंपनी या स्मार्टफोनचा सप्लाय भारतात सुरू करणार आहे.
 

आयफोनचा नविन व्हर्जन

फोक्स तायवानच्या मते, आयफोन एसई भारतात लॉन्च करण्याचे कारण म्हणजे पाच वर्षात अॅपल आपला शेयर दुप्पट करणार आहे. मुख्यत:लॉन्चिंग नंतर आयफोन SE ला अजून कुठलाच अपग्रेड मिळालेला नाही.
 

लॉन्चिंगसाठी सरकारशी केले बोलणे

याचवर्षी कंपनीने मार्च महिन्यात या फोनचे जास्त प्रकार लॉन्च केले. अहवालानूसार, कंपनी आपली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलत आहे. त्यामुळेच कंपनी आपली उत्पादनक्षमता पाच वर्षात दोन-तीन पटीने वाढवू शकेल.