Royal Enfield Classic 350 : भारतीय रस्त्यांवर कमालीची कामगिरी करणारी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी रॉयल एनफिल्ड ही बाईक नुकतीच नव्यानं लाँच करण्यात आली आहे. एनफिल्डनं Royal Enfield Classic 350 अनोख्या अंदाजात लाँच केली असून, त्यासोबत बाईकलमध्ये महत्त्वाचे अपडेटही दिले आहेत. मॉडर्न लूक आणि युजर फ्रेंडली घटकांवर यावेळी कंपनीनं अधिक लक्ष दिलं असून, पाच नव्या व्हेरिएंटमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे. अनेक डिलरशिप आणि शोरुममध्ये या बाईकच्या टेस्ट राईड आणि बुकिंगही सुरू झाल्या आहेत.
रॉयल एनफिल्डवर विशेष प्रेम असणाऱ्यांसाठी ही बाईक त्यांच्या खिशालाही परवडणारी आहे. कारण बाईकची सुरुवातीची किंमतच 1.99 लाख रुपये इतकी असून सर्वाधिक किंमत 2.3 लाख रुपयांना असून, क्रोम व्हेरिएंटसाठी ही किंमत मोजावी लागते.
एनफिल्डच्या नव्यानं सादर करण्यात आलेल्या या बाईकमध्ये एलईडी हायलाईट्स, टेललाईट आणि इंडिकेटर देण्यात आले आहेत. बाईकला असणारे पायलट मार्कर लाईटसुद्धा आता एलईडीमध्ये देण्यात आले आहेत. बाईकला आधुनिक रुपात सादर करण्याच्या हेतूनं कंपनीकडून अॅडजस्टेबल ब्रेक, क्लच लिव्हर देण्यात आले असून नवे गिअरही दिले आहेत. या बाईकला टाईप सी चार्जरही देण्याक आला असून, सुरु प्रवासात तुम्हाला मोबाईल चार्ज करता येणार आहे.
The 2024 Classic 350. Gleaming new colours. Updated features. Unwavering style.
Bookings open on 01.09.2024. #AllNewClassic350 #StayTrueStayClassic #Classic350 #RidePure #PureMotorcyclinghttps://t.co/ENSeywsi4M— Royal Enfield (@royalenfield) August 28, 2024
बाईकच्या जे सीरिज इंजिनमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून, ती 349cc सिंगल सिलिंडर इंजिनावर धावणार आहे. हे इंजिन 20.2 bhp पॉवरनं 27 Nm टॉर्क जनरेट करते. गेल्या अनेक वर्षांपासून या बाईकनं बाईकप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळं आता तिच्या नव्या मॉडेललाही तितकीच पसंती मिळेल असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.