स्पोर्ट्स मोटरसायकलिंगच्या जगात बजाज पल्सरची दमदार Entry; आताच खरेदी करण्याचा निर्णय घ्याल

आता आखा ऑफरोडींगचे बेत   

Updated: Aug 26, 2022, 03:54 PM IST
स्पोर्ट्स मोटरसायकलिंगच्या जगात बजाज पल्सरची दमदार Entry; आताच खरेदी करण्याचा निर्णय घ्याल  title=
Bajaj pulsur NS 125 enters in sports motorbike world

मुंबई : गेल्या काही काळात बाईकप्रेमींची संख्या वाढली आहे. ऑफरोडिंग करत विविध ठिकाणांना भेट देण्याकडे सध्याच्या तरुणाईचा प्रचंड कल पाहायला मिळत आहे. त्यातच खिशाला परवडेल इतक्या दरात बाईक घेण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. 

रस्त्यावर सुस्साट वेगात चालवण्यासाठी स्पोर्ट्स बाईक घ्यायची असल्यास बऱ्याचजणांच्या डोक्यात एकच नाव येतं, ते म्हणजे बजाज पल्सर; मग ती NS200 असो वा NS160. पल्सरच्या NS सीरिजनं गेल्या दशकभरात भारतातल्या स्पोर्ट्स बाईकची एक नवी व्याख्या आकार आणली आहे. 

नवी बजाज पल्सर NS125 (Bajaj Pulsar NS125) ही पल्सर बाईकच्या रेंजमध्ये सामील होणारी सर्वांत कमी वजनाची बाईक आहे. ही बाईक म्हणजे स्पोर्टी लूक्स, परफॉर्मन्स आणि अ‍ॅक्सेसिबल पॉवरचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन ठरेल.

‘Naked Sports’ (NS) या बजाजच्या सर्वांत जबरदस्त बाईक्सच्या श्रेणीतली पल्सर NS125 ही देखील इतर बाईक्ससारखीच चपळ आणि दणकट आणि स्पोर्टी बाईक आहे. NS125 च्या आधीच्या NS160 आणि NS 200 या बाईक आपल्या याच वैशिष्ट्यांमुळे रस्त्यांवर कमाल परफॉर्म करत आहे.

पहिल्याच वेळेस मोटरसायकलिंगच्या उद्देशाने स्पोर्टी बाईक घेण्याऱ्या ग्राहकांसाठी बजाज पल्सर NS125 हिच परफेक्ट निवड ठरेल. पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विचार करता 125CC चं इंजिन असलेली बाईक स्पोर्टी आणि इकॉनॉमी या दोन्ही दृष्टिंनी उत्तम आहे. या बाईकला 125 cc DTS-i इंजिन आहे जे 8.82 kW (12 PS) इतकी पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करतं. त्यामुळेच NS125 ही बाईक तिच्या श्रेणीतली (ज्या बाईक्सची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपये आहे अशी श्रेणी) सर्वात प्रभावी बाईक ठरते.

बजाज पल्सर NS125 17 इंची अलॉय व्हिल्सवर धावते आणि तिचं वजन आहे 140 किलो. पुढच्या चाकाला असलेला 240 mm petal disc brake आणि मागच्या चाकाला असलेले 130 mm drum brake ने युक्त अँटि-स्किडिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या बाईकला ब्रेकिंगची जबरदस्त पॉवर देण्यात आली आहे. टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युएल शॉक अबसॉर्बर्ससह असणार नायट्रॉक्स सस्पेन्शन यामुळे कोणत्याही स्पीडला बाईक स्मूथ चालते.