BMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: दोघांमध्ये काय फरक आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

BMW G 310 RR ही बाइक TVS 310 RR वर आधारित आहे. अशा स्थितीत या दोन बाइक्समध्ये काय फरक आहे? असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Updated: Jul 18, 2022, 12:31 PM IST
BMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: दोघांमध्ये काय फरक आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या title=

BMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: बीएमडब्ल्यू आणि टीव्हीएसच्या भागीदारी अंतर्गत BMW G 310 R आणि BMW G 310 GS आधीच बाजारात उपलब्ध आहेत. दोन्ही एकाच इंजिनद्वारे समर्थित असून टीव्हीएसच्या 310 RR मध्ये उपलब्ध आहे. आता बीएमडब्ल्यूने त्याच भागीदारी अंतर्गत आणखी एक बाइक लाँच केली आहे. त्याचे नाव BMW G 310 RR आहे. ही बाइक TVS 310 RR वर आधारित आहे. अशा स्थितीत या दोन बाइक्समध्ये काय फरक आहे असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. म्हणूनच, आज आम्ही तुमच्यासाठी या दोन बाईकची किंमत, वैशिष्ट्ये याबाबत सांगणार आहोत. सर्व प्रथम त्यांच्या किंमतींबद्दल बोलूया. दोन्ही बाइकच्या किमतीत 20 हजार रुपयांचा फरक आहे. BMW G 310 RR ची किंमत 2.85 लाख रुपये आहे. तर TVS Apache RR 310 ची किंमत 2.65 लाख रुपये आहे.

BMW G 310 RR आणि TVS Apache RR 310 चे स्पेसिफिकेशन्स

TVS Apache RR 310 मध्ये 312.2 cc, 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. यात अर्बन, रेन, स्पोर्ट्स आणि ट्रॅक मोड मिळतात. स्पोर्ट्स आणि ट्रॅक मोडमध्ये इंजिन 34 PS@9700 rpm जास्तीत जास्त पॉवर देते तर शहरी आणि रेन मोडमध्ये 25.8 PS@7600 rpm कमाल पॉवर देते. त्याच वेळी, ते स्पोर्ट्स आणि ट्रॅक मोडमध्ये 27.3 Nm @ 7700 rpm कमाल टॉर्क जनरेट करते, तर शहरी आणि रेन मोडमध्ये 25 Nm @ 6700 rpm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. त्याचा टॉप स्पीड 160 किमी/तास आहे. इंजिन 7.17 सेंकदात 0-100km/h वेग मिळवू शकते. गाडीची उंची - 1135 मिमी, लांबी - 2001 मिमी आणि रुंदी - 786 मिमी आहे. त्याच वेळी, व्हीलबेस 1365 मिमी आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे.

दुसरीकडे, बीएमडब्ल्यू G 310 RR बद्दल बोलायचं झालं, तर त्यात देखील तेच स्पेसिफिकेशन्स आहेत. हे TVS Apache RR 310 प्रमाणेच इंजिनद्वारे समर्थित आहे आणि इंजिन वैशिष्ट्ये समान आहेत. ते समान शक्ती आणि टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन आणि टॉप स्पीड देखील समान आहेत. तथापि, BMW G 310 RR ची रुंदी 767 mm आहे तर TVS Apache RR 310 ची रुंदी 786 mm आहे. दोघांमध्ये 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठण्याची क्षमता समान आहे.

BMW G 310 RR आणि TVS Apache RR 310 चे डिझाइन

दोन्हीच्या डिझाईनमध्ये फरक एवढाच आहे की TVS Apache RR 310 वर तुम्हाला TVS चे ग्राफिक्स मिळतात आणि BMW G 310 RR वर तुम्हाला BMW चे ग्राफिक्स मिळतात. हा छोटासा फरक या दोन्ही बाइकमध्ये आहे.