Colour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत

Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते. 

Updated: Dec 26, 2022, 06:47 PM IST
Colour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत title=

BMW IX Electric SUV Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते. कंपनीने सोशल मीडियावर ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. रंग बदलण्यासाठी फक्त एक बटण क्लिक करावं लागणार आहे. ई इंक युक्त बीएमडब्ल्यू आयएक्स फ्लो काही क्षणात आपला रंग बदलेल. सध्या ही गाडी तीन रंग बदलू शकते. पांढरा, काळा आणि ग्रे हा रंग असणार आहे. 

बीएमडब्लू ई-इंक नावाच्या कंपनीसोबत काम करत आहे. ही कंपनी 1997 पासून वाहनांच्या अॅप्लिकेशनसाठी काम करत आहे. कंपनीच्या मते, रंग बदलण्याची प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलला कंट्रोल करते. या तंत्रज्ञानाला इलेक्ट्रोफोरेटिक तंत्रज्ञान संबोधलं जातं. या तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त उर्जेची आवश्यकता नसते. कंपनीचे ग्रुप डिझाईन प्रमुख एड्रियन वॅन यांनी सांगितलं की, बीएमडब्ल्यू आयएक्स फ्लो एक प्रगत संशोधन आणि डिझाईनचा नमुना आहे. BMW ने ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा निश्चय करत उदाहरण ठेवलं आहे. 

बातमी वाचा: HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

गाडीचा रंग सहज बदलता येत असल्याने एव्हरेजवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. कारण गरमीच्या दिवसात गाडीचा रंग पांढरा केला जाईल. यामुळे सूर्याची किरणं परावर्तित होतील आणि गाडी गरम होणार नाही. दुसरीकडे थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता खेचून घेईल आणि त्यामुळे कार गरम होण्यास मदत होईल.