नवी दिल्ली : कार उद्योगात प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यू (BMW) कंपनीने आपल्या दोन जबरदस्त बाईक्स सादर केल्या आहेत.
इटलीमधील मिलान येथे सुरु असलेल्या EICMA मोटरसायकल शोमध्ये बीएमडब्ल्यूने आपल्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत.
F 750 GS आणि F 850 GS नावाने या दोन बाईक्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स F 700 GS आणि F 800 GS यांचं अपग्रेड व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे. मात्र, सादर केलेल्या बाईक्सच्या मॉडेल्स पाहिल्यानंतर त्या 700 GS आणि F 800 GS यांच्यापेक्षा खूप वेगळ्या दिसत आहेत.
बीएमडब्ल्यू कंपनीने F 750 GS आणि F 850 GS या दोन्ही बाईक्स नव्या इंजिनसह बाईक शोमध्ये सादर केल्या आहेत. या बाईक्समध्ये बॉक्सर-ट्विन इंजिन ऐवजी इक्वल पॉवर असलेलं नवं 853CC पॅरेलल-ट्विन इंजिन दिलं आहे. यासोबतच बाईकमध्ये बॅलेसिंग शॉफ्ट दिलं आहे. यामुळे बाईकमध्ये होणारं वायब्रेशन कमी होतं.
BMW ने 853CC च्या इंजिनला अँटी-हॉपिंग क्लच असलेलं 6 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. हे इंजिन 9.8 bhp पावर आणि 76.4 Nm टार्क जनरेट करतं. इंजिनसाठी देण्यात आलेली नवी फ्रेम खूपच मजबूत आणि फिट आहे.
BMW ने या बाईक्समध्ये डायनॅमिक ईएसए इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन दिलं आहे ज्यामुळे खड्ड्यांतही बाईकची आरामदायक राईड करता येईल. मात्र, ही बाईक बाजारात विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल यासंदर्भात कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाहीये.
यासोबतच रॉयल एनफील्ड कंपनीने आपल्या दोन नव्या बाईक्स मिलानमधील मोटर शोमध्ये सादर केल्या आहेत. या बाईक्सला इंटरसेप्टर 650 ट्विन आणि कॉन्टिनेन्टल GT 650 ट्विन या नावाने सादर करण्यात आलं.