फक्त 1 लाख 60 हजार रुपयांमध्ये खरेदी करा 6 लाखांची CNG कार

जर आपण स्वत: साठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. परंतु वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे तुम्ही मनात संकोच करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणली आहे.

Updated: May 3, 2021, 07:27 PM IST
फक्त 1 लाख 60 हजार रुपयांमध्ये खरेदी करा 6 लाखांची CNG कार title=

मुंबई : जर आपण स्वत: साठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. परंतु वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे तुम्ही मनात संकोच करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणली आहे. ज्यामुळे तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा विचार विसरुन कार खरेदी करालचं....हो तुम्ही बरोबर वाचलात. ही संधी तुम्हाला उप्लब्ध करुन दिली आहे ती मारुती कंपनीने. याअंतर्गत तुम्ही फक्त 1 लाख 60 हजार रुपयांमध्ये 6 लाख रुपयांची सीएनजी कार खरेदी करू शकता.

या कारचे नाव आहे, मारुती वॅगन आर एलएक्सआय आणि ती मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर विकली जात आहे. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू ही देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक मारुती सुझुकी सेकेन्ड हॅन्ड विक्री आणि खरेदी चा प्लॅट फॅार्म आहे. यामध्ये कंपनी मारुतीच्या कारचे नूतनीकरण करुन विकते.

फक्त 1.60 लाखात मारुती वॅगन आर एलएक्सआय सीएनजी घरी आणा

ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर विकली जाणारी मारुती वॅगन आर एलएक्सआय कार ही एक सेकंड हँड कार आहे आणि ती सीएनजीवर चालविली जाऊ शकते. ही आतापर्यंत एकूण 142087 किमी चालली आहे. या कारचा रंग पांढरा आहे. 2011च्या या मॉडेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन बसवले आहे.

आपल्याला या कारबद्दल अधिक जाणून घेण्या इच्छित असल्यास, आपण आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी marutisuzukitruevalue.com वर प्रविष्ट करुन अधिक माहिती मिळवू शकता. यासह, टेस्ट ड्राइव्ह बुक करण्याची आणि डीलरशी थेट संपर्क साधण्याची सुविधा देखील आहे. या कारबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/wagon-r-in-delhi-2011/AXiH...) क्लिक करू शकता.

नवीन Wagon R CNG LXI Opt ची किंमत

मारुती सुझुकीच्या नवीन Wagon R CNG LXI Opt ची एक्स-शोरूम किंमत 5.67 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन आणि प्रति किलो सीएनजी मागे 32.52 किलोमीटरचे मायलेज मिळेल. त्याची इंधन क्षमता 60 लिटर आहे. यात 998 CC इंजिन आहे जे 5500rpm वर जास्तीत जास्त 58.33bhp आणि 5800rpm वर 78Nm ची टॉर्क जनरेट करते.