१५ ऑगस्टला भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर

सरकारी भिम अॅपला खासगी अॅपचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर उद्या १५ ऑगस्टला खरेदीवर असणार आहे.

Updated: Aug 14, 2017, 05:27 PM IST
१५ ऑगस्टला भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर title=

मुंबई : सरकारी भिम अॅपला खासगी अॅपचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर उद्या १५ ऑगस्टला खरेदीवर असणार आहे.

भारत सरकारने डिजिटल पेमेंटकरिता भिम अॅप्लिकेशनचा वापर वाढविण्यासाठी ही खास ऑफर केली आहे. या अॅपचा वापर करून व्यवहार करणाऱ्यांना मोठी कॅशबॅक ऑफर मिळण्याची शक्‍यता आहे.  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) वतीने भिम अॅपची निर्मिती केली होती. हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी डिसेंबरमध्ये हे ऍप सुरू करण्यात आले होते. 

 सध्या भिमअॅप्लिकेशनचा वापर करणाऱ्यांना १० ते २५ रुपये कॅशबॅक ऑफर दिली जाते. आता १५ ऑगस्टला अॅपवर यापेक्षा जास्त कॅशबॅक देण्याचा सरकार विचार करत आहे.