मुंबई : डिजिटायझेशनच्या काळात स्मार्ट डिव्हायसेस माणसांच्या जीवनाचा आता एक भाग होत चालला आहे. कोणत्याही डिव्हाइसला चालण्यासाठी इलेक्ट्रीसिटी किंवा बॅटरीची गरज असते. आता तर जास्त क्षमतेची बॅटरीही पुरत नाही. यामुळेच आता वैज्ञानिकांनी अशा प्रकारचा मोबाईल फोन तयार केला आहे, ज्याला बॅटरीची आवश्यकताच नाही. वैज्ञानिकांनांच्या या शोधामुळे भविष्यात बॅटरी विनाच डिवाईस चालेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बऱ्याचदा फोनची बॅटरी संपल्याने आपल्यास अडचण येते. पण जर बिना बॅटरीचाच मोबाईल आला तर माणसाची ही अडचण कायमचीच दूर होऊन जाईल. अमेरिकेतील एका विद्यापीठातील संशोधकांनी असा फोन तयार केला आहे ज्याला बॅटरीची आवश्यकता नाही.
बॅकस्कॅटर टेक्नॉलॉजीचा वापर
अमेरिकन वैज्ञानिकांनी एक बॅटरी-फ्री फोन तयार केला आहे. हा फोन बॅकस्कॅटर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. वैज्ञानिकांनी आताच याचा प्रोटोटाइप तयार केला आहे, परंतु या शोधामुळे भविष्यात बॅटरी नसतांनाही उपकरण चालवणं शक्य होणार आहे.
हा एक बेसिक फिचर फोन आहे. यामध्ये सर्किट बोर्डवर फिजिकल कीपॅडसह एक लहान एलईडी डिस्प्ले लाईट लावली आहे.
15 मीटर्सच्या अंतर पासून ते संभाषण
बॅकस्केटर तंत्रज्ञानावर आधारित हा फोन मॅसेज पाठविणे किंवा प्राप्त करणे यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या 'लो पावर रेडियोचे सिंग्नल वापरतात. हे उपकरण डिजिटल ऐवजी ऐवजी अॅनालॉग टेक्नॉलॉजीचा वापर करतात.
याद्वारे मनुष्य सुमारे 15 मीटर दूरून फोनवर सहज संवाद साधू शकतो. शोधकर्तांनी सांगितलं की, एनालॉग ह्यूमन स्पीचमध्ये डिजिटल सिग्नल मध्ये ट्रान्सफर होऊन कम्युनिकेट व्हायला खूप अधिक प्रमाणात ऊर्जा खर्च होते.
पण अॅनालॉग टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास अत्यंत कमी ऊर्जाची आवश्यकता असते. हे यंत्र अस्तित्वात असलेल्या रेडिओ तरंगांचा वापर करतो.
अशाप्रकारच्या तंत्राचा वापर शीत युद्ध काळातही केला गेला आहे. हा यंत्र फक्त एका निश्चित रेडिओ फ्रिक्वेंसीच्या सिग्नल द्वारे सक्रिय केला गेला आहे.
बॅकस्केटर तंत्रज्ञानावर आधारित या फोनद्वारे आता फक्त कॉल आणि एसएमएस केले जात आहेत. हा एक बेसिक फोन म्हणून वापरु शकता.