मुंबई : two-wheelers need crash helmet : लहान मुलाला दुचाकीवर (Two-wheeler) बसवत असाल तर तुमच्या मुलालाही हेल्मेट (Helmet) घालायला विसरू नका. कारण केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार दुचाकीवर (Two-wheeler) बसणाऱ्या 9 महिन्यांपासून 4 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांनाही क्रॅश हेल्मेट घालणं सक्तींचे असणार आहे. तसेच लहान मूल (Child) सोबत असेल तर दुचाकीचा वेग ताशी 40 किमीपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. (Children below 4 years old on two-wheelers need crash helmet, safety harness; New rules)
दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या लहान मुलांना लवकरच हेल्मेट घालावे लागणार आहे. तसेच दुचाकीस्वारांना सुरक्षा हार्नेस घालावा लागेल. तसे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नव्या नियमात प्रस्तावित केले आहे. देशात रस्त्यावरील सर्व वाहनांपैकी तीन चतुर्थांश वाहने ही दुचाकी आहेत.
सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीवर लहान मुले असतील तर दुचाकीची वेगमर्यादा ताशी 40 किमी असेल, असे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या नियमाबाबत सार्वजनिक केलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार भारतातील 277.1 दशलक्ष वाहनांपैकी किमान 75 टक्के दुचाकी आहेत. एकट्या दिल्लीत 10 दशलक्ष नोंदणीकृत वाहनांपैकी किमान 7.3 दशलक्ष दुचाकी आहेत. प्रस्तावित नियमांचे कोणतेही उल्लंघन केल्यास 1,000 रुपये आता दंड आकारला जाईल आणि चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल.
चार वर्षांखालील मुलांसाठी, मोटारसायकलच्या चालकाला मुलाला जोडण्यासाठी सुरक्षा हार्नेस वापरला जाईल. सुरक्षा हार्नेस हा मुलाने परिधान केला जाणारा बनियान आहे, जो बदलता येण्याजोगा असेल. या बनियानला जोडलेल्या पट्ट्यांसह आणि दुचालकाने घातलेल्या खांद्यावरील लूप तयार करणे. अशा प्रकारे, मुल आणि चालक सुरक्षितपणे जोडले जातील, असे अधिसूचनेतील मसुद्यात म्हटले आहे.