अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी

गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. 

Updated: Jun 26, 2023, 06:22 PM IST
अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी title=

NASA Achieves New Milestone : अंतराळात अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये  (International Space Station)  काम करताना अंतराळवीरांसमोर पाणी आणि अन्न या दोन प्रमुख घटकांची  मोठी अडचण असते. आअंतराळात पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वर्षांपासून संशोधव सुरु आहे. याबाबत  NASA च्या वैज्ञानिकांचा मोठा प्रयोग यशस्वी झाला आहे. ता अंतराळात मूत्र आणि घामापासून (Urine and Sweat) पिण्याचे पाणी (drinking water) तयार केले जाणार आहे. या प्रयोगाद्वारे अतंराळात  98 टक्के पाणी पुनर्संचयित करता येवी शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 

अन्न, पाणी आणि हवा रिसायकल करणार

अंतराळात अन्न, पाणी आणि हवा रिसायकल करण्याचा वैज्ञानिकां प्रयत्न आहे. अंतराळात ECLSS म्हणजेच पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम आधारावर अंतराळ मोहिमांचे नियोजन केले जाईल.अंतराळात अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर केला जाणार आहे. याबाबतचे वृत्त Space.com ने जारी केले आहे.

मुत्र आणि घामापासून पिण्याचे पाणी कसे तयार करणार?

ECLSS सिस्टीममध्ये पाणी रिसायकल करण्याचे हार्डवेअर असणार आहे. केबिन क्रूच्या श्वासोच्छ्वास आणि घामाद्वारे केबिन हवेतून बाहेर पडणारे पाण्याचे थेंब तसेच मूत्र ECLSS सिस्टीममध्ये स्टोर केले जाणार आहेत.  डिह्युमिडिफायरच्या मदतीने ECLSS सिस्टीममध्ये स्टोर केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे. 

मुत्रामध्ये आढळले 98 टक्के शुद्ध पाणी

ECLSS सिस्टीममध्ये स्टोर केलेले घामाचे थेंब आणि मूत्र यांच्यावर प्रक्रिया करताना उप-उत्पादन म्हणून खारट पदार्थाची निर्मिती केली जाते. ज्यामधून सांडपाणी काढून टाकण्यासाठी ब्राइन प्रोसेसर असेंबली (BPA) UPA मध्ये जोडली जाते. बीपीएने मूत्रातून काढलेल्या स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 98 टक्क्यांपर्यंत आले आहे. सांडपाण्यापासून तयार करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक शुद्ध पाणी असल्याचे जॉन्सन स्पेस सेंटर टीमचा भाग असलेल्या क्रिस्टोफर ब्राउन यांनी सांगितले.  

अंतराळात झाडं उगवले

अंतराळात फुललेल्या एका फुलाचा फोटो नासानं जारी केला होता. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जिनिया फुल फुललंय. 1970 पासून अंतराळात झाडं उगवण्यावर संशोधन सुरु झालं होते.  तर 2015 पासून प्रयोग सुरु झाले. अंतराळात लेट्युस, टोमॅटोही उगवण्यात आल्याची माहितीही नासानं दिली. दरम्यान अंतराळातलं जिनिया नारंगी रंगाचं आहे. पृथ्वीच्या बॅकग्राऊंडवर फुल अधिक मनमोहक दिसले. याचे फोटो व्हायरल झाले होते.