HONDA Cars ची अनोखी ऑफर! यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हाप्ते भरा

सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने (Honda cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे.

Updated: Oct 4, 2022, 11:51 AM IST
HONDA Cars ची अनोखी ऑफर!  यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हाप्ते भरा title=

Honda cars offers: नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने (Honda cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून खरेदीदार 2022 मध्ये कार खरेदी करु शकतात आणि त्याचे मासिक हाप्ते पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 ला भरु शकतात. कंपनीकडून कार खरेदीसाठी उत्तमरित्या फायनांनसिंगची पुर्णपणे सोय केली आहे. होंडा कंपनीने प्रायव्हेट सेक्टरच्या कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेडशी (KMPL) एक करार केला आहे, ज्याद्वारे ही ऑफर दिली आहे.  

सर्व अधिकृत डीलशिपमध्ये मिळणार ही ऑफर

होंडा कंपनीकडून दिली जाणारी ही ऑफर होंडा सिटी (Honda City offers) आणि होंडा अमेज (Honda Amaze offers) कार्ससाठी दिली जात आहे. या ऑफर्सचं नाव 'Drive in 2022, Pay in 2023' असून, ही ऑफर ऑथोराइज्ड डीलरशिप आणि देशभरातील KMPL च्या ब्राँचमध्ये उपलब्ध आहे.

कधीपर्यंत असणार 'ही' ऑफर?

होंडा कार्स इंडियाच्या तर्फे सुरु असलेल्या या 'Drive in 2022, Pay in 2023' ऑफरची शेवटची तारीक 31 ऑक्टोबर आहे. या ऑफरच्या माध्यातून कार खरेदी केल्यास सुरुवातीची तीन महिने ईएमआय देण्याची गरज नसणार आहे, यानंतर चौथ्या महिन्यापासून कर्जाची फेड होईपर्यंत खरेदीदाराला ईएमआय (EMI) भरावा लागेल.