मुंबई : फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर आणलंय. 'वॉच पार्टी' नावाच्या या फिचरमध्ये सोशल नेटवर्कींग साईट सर्फिग करताना व्हिडिओ पाहणं आणि कमेंट करण्याचीही सोय आहे. साधारण सहा महिन्याच्या परीक्षणानंतर बुधवारी फेसबुकने हे फिचर लॉन्च केलं. यातून फेसबुक व्हिडिओ स्ट्रिमिंग स्पेसमध्ये युट्यूबशी स्पर्धा करतेय. एकदा वॉच व्हिडिओ पार्टी सुरू केल्यानंतर युजर्स लाईव्ह किंवा रेकॉर्ड व्हिडिओ पाहू शकतात. यासोबतच एकमेकांशी गप्पाही मारू शकतात.
या नव्या फिचरचा उपयोग करण्यासाठी युजर्सला फेसबुकवर एक व्हिडिओ शोधुन त्यावर इतरांना आमंत्रित कराव लागेल. त्यानंतर चॅट विंडो उघडेल आणि व्हिडिओ सुरू असतानाच आपआपसात चर्चा करु शकतात. जगभरातील युजर्ससाठी हे फिचर खुले करण्यात आलंय. यासोबतच दोन नवे बदलही करण्यात आले आहेत जे सध्या उपलब्ध नाहीत. यामध्ये असलेल्या को होस्टिंगमुळे 'वॉच पार्टी' चा यजमान इतरांना व्हिडिओशी जोडून 'वॉच पार्टी' सुरू ठेवू शकतो. यामध्ये आऊटसोर्सिंग फिचरही जोडलंय. 'वॉच पार्टी' केवळ फेसबुक ग्रुपपुरतीच मर्यादीत नसून फिचर कंपनी पेजसाठी उपयोगी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.