फेसबूकचे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात

"आमच्यासाठी कामं शोधा", असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली.

Updated: Dec 5, 2018, 07:26 PM IST
फेसबूकचे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात

मुंबई : फेसबूकच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फेसबूक आपल्या युझर्सना नवनवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात असते. नुकत्याच फेसबुकवर व्हिडीओतून कमाई करण्याची संधी फेसबुकने दिली. अनेकांना फेसबूक आपल्या माध्यमातून रोजगार देत आहे, मात्र या फेसबूकच्या कामगारांवर दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याची वेळ आली आहे. 

फेसबूकसोबत मागील काही महिन्यात अप्रिय घटना घडल्या. त्यात फेसबूक डेटा लीक प्रकरण घडल्याने, कंपनीच्या शेअर्सच्या किंमती कमी घसरल्या आहेत. त्यामुळे फेसबूकचे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम मिळतंय का याची चाचपणी करत आहेत.

सीएनबीसीच्या बातमीनुसार, फेसबूकचे कर्मचारी आपल्या माजी फेसबूक कर्मचाऱ्यांना नोकरी शोधण्यासाठी सांगत आहेत. "आमच्यासाठी कामं शोधा", असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली.

वृत्तानुसार, नोकरी सोडणं ही बाब इतर कंपन्यासाठी सामान्य आहे, पण फेसबूकसाठी नाही. कारण सिलिकॉन व्हॅलीत फेसबूकसाठी काम करणं प्रतिष्ठेचं समजलं जातं.

फेसबूकच्या अंतर्गत सर्वेक्षणाची माहिती देणाऱ्या 'वॉल स्ट्रीट जनर्ल'च्या अहवालानुसार ५२ टक्के कर्मचारी हे फेसबूकच्या भविष्याबद्दल अनुकूल आहेत.

प्रकरण काय आहे ?

केंब्रिज अॅनालिटीका नुसार, ८७ दक्षलक्ष युझर्सची गोपनीय माहिती लीक झाल्यापासून फेसबूक वादाच्या भोवऱ्याच सापडलंय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ड्रोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'कँब्रिज अॅनालिटीवर' ५ कोटी फेसबूक युझर्सची माहिती चोरल्याचं आरोप आहे. ५ कोटी फेसबूक युझर्सची गोपनीय माहिती चोरी केल्याचा आरोप फेसबूकवर होता.