मुंबई : सायकल, लॅपटॉप सारख्या वस्तू चोरीस गेल्या तर सहसा सापडत नाही. पोलिसात तक्रार दिली तरी आपली वस्तू परत मिळेल याची काही शाश्वती नसते. चोर बड्या शिताफिने लॉक तोडून आपली सायकल अथवा लॅपटॉप घेऊन कुठच्या कुठे फरार होतो. असे चोर शोधणे हे पोलिसांसमोरही मोठं आव्हान असत. पण यापुढे पोलिसांच काम सोप्प झालंय. कारण ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट बाजारात आलंय. याला ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. ३० मीटरच्या अंतरात आपली वस्तू कुठे आहे याचा अंदाज आपल्याला येणार आहे. या अंतराच्या बाहेर वस्तू गेल्यास लगेच तुम्हाला अलर्ट येणार आहे. या वस्तू कोणी चोरी करून दूर नेण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या मोबाईलवर आलार्म वाजणार आहे. तीन डिझाइन आणि दोन सुंदर रंगामध्ये ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’ तुम्हाला उपलब्ध आहे.
प्ले स्टोअरवरून‘डिजीटेक ट्रॅकर’अॅप डाउनलोड करा
ब्ल्यूटुथला कनेक्ट करा
५९५ रुपयांपर्यंत हे डिव्हाइस उपलब्ध आहे.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा शॉपक्लूज या शॉपिंग साईट्सवर उपलब्ध