Flipkart वर ऑफर्सचा पाऊस, हे शानदार डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा

जे टॉप ब्रँडचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही घरी टीव्ही घेऊ इच्छीत असाल, तर ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.

Updated: Jul 12, 2022, 09:42 PM IST
Flipkart वर ऑफर्सचा पाऊस, हे शानदार डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा title=

मुंबई : चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर नव्हे तर मोठ्या स्क्रीनवर पाहता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात एक उत्तम डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता आणि यासाठी तुम्हाला 2 हजार रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागेल. खरंतर हे स्‍मार्ट टीव्‍ही आहेत, जे टॉप ब्रँडचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही घरी टीव्ही घेऊ इच्छीत असाल, तर ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.

Xiaomi 5A HD Ready LED Smart Android TV: Xiaomi चा हा 32-इंचाचा डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 24 हजार 999 रुपयांऐवजी Flipkart वर 14 हजार 999 रुपयांना विकला जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही 750 रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही या टीव्हीवर 13 हजार 150 पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता, ज्यामुळे तुम्ही हा टीव्ही 1 हजार 99 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

samsung HD Ready LED smart tizen TV: सॅमसंगचा 22 हजार 900 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही 15 हजार 490 रुपयांना विकला जात आहे. हा 32-इंचाचा डिस्प्ले टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्ही 775 रुपये वाचवू शकता आणि तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह 13 हजार150 रुपयांची सूट मिळू शकते. एकूणच, तुम्ही हा टीव्ही 1 हजार 565 रुपयांना खरेदी करू शकता.

Thomson 9A Series HD Ready LED Smart Android TV: 32-इंचाचा डिस्प्ले असलेला हा स्मार्ट टीव्ही 11 हजार 999 रुपयांना विकला जात आहे, तर त्याची मूळ किंमत 14 हजार 499 रुपये आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही यावर 600 रुपये वाचवू शकता आणि 10 हजार 975 रुपयांची सवलत मिळवू शकता आणि तुमच्या जुन्या टीव्हीची देवाणघेवाण करण्यासाठी ते विकत घेऊ शकता. अशा प्रकारे, हा टीव्ही तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यांत मिळू शकतो.

Reality HD Ready LED smart android TV : रिअॅलिटीचा हा टीव्ही 17 हजार 999 रुपयांऐवजी 15 हजार 499 रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह 13 हजार 150 रुपये आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 775 रुपये वाचवले जाऊ शकतात. हा 32-इंचाचा टीव्ही तुम्हाला 1 हजार 574 रुपयांना मिळू शकतो.

Acer Frameless HD Ready LED Smart Android TV: हा स्मार्ट टीव्ही 32-इंचाच्या डिस्प्लेसह येतो आणि तुम्ही तो 22 हजार 990 रुपयांऐवजी 13 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह 700 रुपये वाचवले जाऊ शकतात आणि एक्सचेंज ऑफरसह 13 हजार 150 रुपये वाचवले जाऊ शकतात. अशा प्रकारे, तुम्ही Acer चा स्मार्ट टीव्ही 149 रुपयांना खरेदी करू शकता.