नवी दिल्ली : लवकरच उत्सवाला सुरूवात होणार आहे. अशातच जिओनी इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर घेऊन आले आहेत. कंपनीने त्यांच्या एका जबरदस्त स्मार्टफोनच्या किंमतीत ३ हजार रूपयांची कपात केली आहे.
जिओनीच्या या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा असून इतर फिचर्सही दमदार आहेत. त्यामुळे हा फोन घेऊ इच्छिणा-यांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे.
जिओनीकडून मार्च महिन्यात १९ हजार ९९९ रूपयांचा हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिओनी ए१ (Gionee A1) स्मार्टफोनची किंमत ३ हजार रूपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा स्मार्टफोन ग्राहक १६ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. १६ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन कंपनी १९ हजार ९९९ रूपयांमध्ये मार्च महिन्यात लॉन्च केला होता. अनेक रिव्ह्यूमधून सांगण्यात आले होते की, हा स्मार्टफोन चांगला आहे.
या स्मार्टफोनच्या बनावटीचं आणि डिझाईनचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. चांगल्या कॅमेरा क्वालिटीसोबतच बॅटरीही उत्तम देण्यात आली आहे. जिओनीचा हा फोन अॅन्ड्रॉईड ७.० नूगा आधारित अॅमिगो ४.० वर चालतो. या फोनमध्ये ४०१० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तर ड्युअल सीम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची फुल एचडी स्क्रिन देण्यात आली आहे.
यासोबत या फोनमध्ये मीडियाटेक हीलिओ पी१० चिपसेट देण्यात आलाय. फोनचं इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबीचं आहे, ते २५६ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकतं. ४ जीबीची रॅम या फोनमध्ये देण्यात आली आहे.