close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खुशखबर ! वोडाफोनची आता ही घरपोच सेवा

टेलीकॉम क्षेत्रात सध्या जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. बाजारातल्या या स्पर्धेला पाहता वोडफोन कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने प्रीप्रेड ग्राहकांना त्यांच्या घरपोच 4G सिम पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: May 7, 2019, 07:04 PM IST
खुशखबर ! वोडाफोनची आता ही घरपोच सेवा

मुंबई : टेलीकॉम क्षेत्रात सध्या जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. बाजारातल्या या स्पर्धेला पाहता वोडफोन कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने प्रीप्रेड ग्राहकांना त्यांच्या घरपोच 4G सिम पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा फक्त नव्याने घेतलेल्या प्रीप्रेड ग्राहकांसाठी असणार आहे. ग्राहकाला या सुविधेसाठी कंपनीच्या वेबसाईटवरुन 249 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. ग्राहकाला इतर कंपनीमधून वोडाफोनमध्ये नंबर पोर्ट करायचा असेल, तरी देखील त्याला ही सुविधा मिळणार आहे.

या प्लॅनची वैधता 28 दिवसांठी असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळणार आहे. सोबतच दररोज 100 मेसेज देखील या प्लॅनमध्ये मिळतील.

आपण जर वोडाफोनचे नवीन ग्राहक असाल आणि आपला नंबर जर वोडाफोनमध्ये पोर्ट करणार असाल तर आपल्याला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथेचं तुम्हाला नव्या नंबरसाठी आणि नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट टाकावी लागेल. 4 दिवसानंतर 4G सिम कार्ड आपल्या घरी पोहचवण्यात येईल. वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर ग्राहकाकडून वैयक्तिक माहिती मागितली जाईल.

मागच्या काही दिवसांत वोडाफोनने 139 रुपयाचा नवीन प्लॅन बाजारात आणला होता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स ऐवजी डेटा देखील देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना 5 जीबी 3G/4G डाटा मिळत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यासोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे