गुगल आणतंय Verified Calls फिचर, Truecaller ला टक्कर

गुगलने ऍन्ड्रॉईड फोनसाठी Verified Calls फिचरची घोषणा केली आहे.

Updated: Sep 10, 2020, 11:20 PM IST
गुगल आणतंय Verified Calls फिचर, Truecaller ला टक्कर title=

मुंबई : गुगलने ऍन्ड्रॉईड फोनसाठी Verified Calls फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर ट्रूकॉलरला टक्कर देणारं आहे. यामुळे ग्राहकांना स्पॅम कॉल आणि फ्रॉड कॉलपासून वाचण्यास मदत होणार आहे. या नव्या फिचरमुळे ग्राहकांना बिजनेस नंबर सहज ओळखता येतील. फोनवरून होणारे फ्रॉड ही फक्त भारतातलीच नाही, तर जगभरातली समस्या आहे. आता गुगलचं Verified Calls फिचर तुम्हाला फोन करणाऱ्याची ओळखही दाखवेल. Verified Calls फिरच पहिले भारत, मॅक्सिको, ब्राझील, स्पेन आणि अमेरिकेत लॉन्च करण्यात येणार आहे. यानंतर जगाच्या इतर भागात हे फिचर लॉन्च केलं जाईल.

गुगलने एका ब्लॉगपोस्टमधून या फिचरबाबत माहिती दिली आहे. स्पॅम आणि स्कॅम कॉल भारतात मोठी समस्या आहे. २०१९ साली पटियालाच्या माजी महाराणीला एका अज्ञात नंबरवरून फोन आला आणि त्यांच्या खात्यामधून २३ लाख रुपये लंपास करण्यात आले. अशाप्रकारच्या स्पॅम कॉलच्या समस्यांचं Verified Calls फिचरमधून निराकरण होईल, असा विश्वास गुगलला आहे.