अ‍ॅप्पलच्या स्मार्टवॉचनंतर Google Pixel Watch चा बोलबाला; जाणून घ्या फीचर्सबद्दल...

डिजिटल दुनियेतील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या Google कंपनीने नुकतेच Google Pixel Watch चं ऑफिशिअल लाँचिंग करण्याआधीच टीजर रिलीज केलं आहे.

Updated: Sep 25, 2022, 09:52 AM IST
अ‍ॅप्पलच्या स्मार्टवॉचनंतर Google Pixel Watch चा बोलबाला; जाणून घ्या फीचर्सबद्दल... title=

Google Pixel Watch : डिजिटल दुनियेतील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या Google कंपनीने नुकतेच Google Pixel Watch चं ऑफिशिअल लाँचिंग करण्याआधीच टीजर रिलीज केलं आहे. या टीजरमध्ये स्मार्टवॉचचं आकर्षक असणारं डिझाईन स्पष्टपणे दिसत आहे. गूगलच्या या स्मार्टवॉचला Google Pixel 7 सीरिजसोबत लाँच केलं जाईल.

Google Pixel Watch चं टीजर

गुगल पिक्सेल वॉचचा टीझर पाहता, या स्मार्टवॉचमध्ये स्टेनलेस स्टीलच्या राउंड डायल असतील असं दिसत आहे. त्याच्या उजव्या बाजूला एक बटण आहे, ज्यावरून या स्मार्टवॉचला नियंत्रित केलं जाऊ शकतं. याशिवाय, येऊ घातलेल्या स्मार्टवॉचमध्ये हार्ट-रेट मॉनिटरिंग सेन्सरपासून अनेक वॉच-फेस उपलब्ध असणार आहेत. तसेच, Google Pixel Watch ब्लॅक आणि पीच कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Google Pixel Watch की लीक स्पेसिफिकेशन

लीक रिपोर्ट्सनुसार, Google Pixel Watch मध्ये गोल OLED डिस्प्ले असणार आहे. त्यासोबतच, Exynos 9110 प्रोसेसर आणि 1.5GB किंवा 2GB स्टोरेज असण्याची दाट शक्याता आहे. याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये गूगल असिस्टेंट आणि मॅक्सचा सपोर्ट मिळणार आहे.

या स्मार्टवॉचच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये पावरफूल बॅटरी मिळणार आहे जी एका फुल चार्जमध्ये 8 दिवसांचा बॅकअप देईल. याव्यतिरिक्त, यास्मार्टवॉचमध्ये LTE, Bluetooth आणि Wifi सारख्या कनेक्टिविटी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

Google Pixel Watch ची संभाव्य किंमत

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, Google Pixel Watch ची किंमत 19 हजार 250 रुपये ते 27 हजार 900 रुपयांच्या दरम्यान असू शकते. या स्मार्टवॉचला अनेक कलरच्या पर्यांमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं. असं असलं तरी, गूगल कंपनीने Google Pixel Watch ची किंमत आणि फीचर्सबद्दल कोणातीही माहिती दिली नाही.

टीजर पाहा...