आता तुमचा मोबाईल होणार अधिक स्मार्ट; Googleने आणलं नवं फिचर

जाणून घ्या कसं असेल नवं फिचर   

Updated: Feb 24, 2021, 09:26 AM IST
आता तुमचा मोबाईल होणार अधिक स्मार्ट; Googleने आणलं नवं फिचर  title=

नवी दिल्ली : आजच्या या धावपळीच्या विश्वात प्रत्येक जण स्मार्ट फोनचा वापर करतो. पण आता तुमचा हा स्मार्ट फोन आणखी स्मार्ट होणार आहे. Googleने त्यांच्या युजर्ससाठी नवीन फिचर आणलं आहे. आता लवकरच तुम्ही तुमचा SMS शेड्यूल करू शकता. शिवाय Google Assistant वापरण्याची नवी पद्धत लवकरच लँच होणार आहे. त्यामुळे आता स्मार्ट फोन वापरकर्त्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 

Google आता SMS करण्याची पद्धत आहे ती बदलणार आहे. Google त्यांच्या ऑफिशियल ब्लॉगमध्ये संबंधीत माहिती दिली आहे. नवीन फिचर आल्यानंतर तुम्ही SMS शेड्यूल करू शकता. म्हणजे आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि ठरावीक वेळ शेड्यूल करून SMS करू शकता. 

यापूर्वी SMS टाईप केल्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीला SMS पाठवता येत होता. पण नव्या फिचरमुळे ठरावीक वेळ लावून SMS पाठवता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना किंवा ऑफिसमध्ये SMS पाठवायचा असल्यास नवा फिचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे. 

Google एंड्रॉयड फोनमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. आता तुम्ही लॉक एंड्रॉयड फोनमध्ये देखील Google Assistantचा वापर करू शकता. म्हणजे कोणत्याही कामासाठी तुम्हाला सतत फोनचा लॉक ओपन करण्याची गरज नाही. तुम्हाला लॉक स्मार्ट फोनमध्ये अलार्म सेट करता येणार आहे शिवाय आवडतीचे गाणी देखील ऐकू शकता येणार आहेत. 

गुगलच्या मते, Android 7 आणि त्यांच्या वरील ऑपरेटिंग सिस्टममध्ये देखील लवकरच दोन नवे अपडेट लाँच  होणार आहेत. कंपनीने यासाठी तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमचा स्मार्ट फोन अधिक स्मार्ट होणार आहे.