मुंबई : दिग्गज व्यक्तींची मते सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाची आहेत. अलीकडेच गुगलेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एका मुलाखतीत आपल्या सवयी सांगितल्या. या मुलाखती दरम्यान त्यांनी तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक सवयी सांगितल्या आहेत. Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, ते किती वेळा त्यांचा पासवर्ड बदलतात, किती फोन वापरतात?
मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारले गेले की, तुम्ही मुलांना युट्यूब वापरु देतात का? तेव्हा त्यांनी सांगितले की हो ते वापरतीलच. कारण येणाऱ्या पिढी तंत्रज्ञान शिकणे आणि जबाबदार असणे आवश्यक आहे.
जेव्हा त्यांना विचारले की ते त्यांच्या मुलांना स्क्रीनवर किती काळ राहू देतात? यावर ते म्हणाले की, 'मुलांना त्यांचे स्वातंत्र्य आहे. हा वैयक्तिक निर्णय असावा,' असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.
तुम्ही किती वेळा पासवर्ड बदलतात ? ते म्हणाले की, 'ते वारंवार पासवर्ड बदलत नाहीत. पण त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अवलंबण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप चांगले आहे.'
सुंदर पिचाई यांना आपण किती फोन वापरतात असे विचारले असता ते म्हणाले की, ते वेगवेगळ्या कामांसाठी एकावेळी 20 हून अधिक फोन वापरतात. ते म्हणाले की, मी सतत फोन बदलत असतो आणि नवीन फोनची चाचणी करत असतो.