नवी दिल्ली : एएनआय या वृत्तसंस्थेने अलीकडेच ट्विटरवर माहिती दिली की, भारत सरकार लवकरच 54 चीनी Appवर बंदी घालणार आहे. या Appमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने, ते लवकरच बंद करण्यात येणार आहे. या Appमध्ये AppLock आणि Garena Free Fire सारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
एएनआयने माहिती दिली की सरकार 54 चीनी Appवर बंदी घालणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याच्या कारणास्तव हे App बंद करण्यात येणार आहे. चीन आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे 54 चिनी App देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.
Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources
— ANI (@ANI) February 14, 2022
सध्या सरकार ज्या Appवर बंदी घालत आहे त्यांच्या नावांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जी नावे समोर आली आहेत त्यामध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera - Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock, and Dual Space Lite आदी अनेक App आहेत.
गेल्या वर्षी सरकारने PUBG, Tiktok आणि Cam Scanner सारख्या अनेक Appवर बंदी घातली होती.