हीरोच्या बाईकची २ नवी व्हर्जन लॉन्च

देशातली सगळ्यात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रोची नवी व्हर्जन लॉन्च केली आहेत.

Updated: Mar 14, 2018, 08:29 PM IST
हीरोच्या बाईकची २ नवी व्हर्जन लॉन्च  title=

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रोची नवी व्हर्जन लॉन्च केली आहेत. नव्या पॅशन प्रोची किंमत ५३,१८९ रुपये तर पॅशन एक्स प्रोची किंमत ५४,१८९ रुपये आहे. हीरो पॅशन ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी दुसरी बाईक आहे. पहिल्या क्रमांकावर हीरोची स्प्लेंडर आहे.

दोन्ही बाईक ५ रंगांमध्ये उपलब्ध

या दोन्ही बाईक ५ रंगांमध्ये मिळणार आहेत. नव्या पॅशन प्रोमध्ये फ्लश कॅपसोबत ११ लीटरचा फ्युअल टँक देण्यात आलाय. टेल लॅम्पच्या लूकमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन पॅशन प्रो डिस्क आणि ड्रम ब्रेक दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत.

नवीन पॅशन प्रो स्पोर्ट्स रेड, ब्लॅक मोनोटोन, फोर्स्ड सिल्व्हर, हेवी ग्रे आणि फ्रोस्ट ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसंच पॅशन प्रो नव्या ग्राफिक्ससह लॉन्च करण्यात आली आहे.