होंडाचा धमाका! अनेक कारवर खास ऑफर

सगळीकडे सध्या उत्सवाचं वातावरण असून अशात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होंडाने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ ही स्पेशल ऑफर असून याद्वारे अनेक कारवर घसघशीत सूट दिली जाणार आहे.

Updated: Sep 6, 2017, 05:29 PM IST
होंडाचा धमाका! अनेक कारवर खास ऑफर title=

मुंबई : सगळीकडे सध्या उत्सवाचं वातावरण असून अशात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होंडाने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ ही स्पेशल ऑफर असून याद्वारे अनेक कारवर घसघशीत सूट दिली जाणार आहे.

होंडाची ही ऑफर एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत असणार आहे. होंडाच्या ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट आणि १ रुपयात होंडा एश्योर सब्सक्रिप्शन मिळणार आहे. इतकेच नाहीतर दोन भाग्यवान विजेत्यांना अमेरिका फिरण्याचीही संधी मिळणार आहे. जे ग्राहक एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरमध्ये नवी होंडा कार खरेदी करतील ते अमेरिका ट्रिपसाठी दावेदार ठरतील. त्यासाठी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन ‘एडवेंचर ऑफ स्पेस, अर्थ एंड ओसियन’ येथे तुमची माहिती भरावी लागेल. 

होंडाच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट?

होंडा ब्रियो : ब्रियो कारवर २१,२०० रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १ रुपयात होंडाची एश्योर मेंबरशीप देखील मिळणार आहे.

होंडा अमेझ : होंडा अमेझच्या एस, एस (ओ), एसव्ही आणि व्हीएक्स व्हेरिएंट (पेट्रोल आणि डिझेल) वर ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

होंडा जॅज : होंडा जॅज या कारवर ४२,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये १ रुपयांत होंडा एश्योर मेंबरशीप मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटवर ही ऑफर असणार आहे.

होंडा बीआर-व्ही : व्हीएक्स ग्रेड (पेट्रोल आणि डिझेल) व्हेरिएंटवर एक लाखापर्यंतची सूट मिळू शकते.