तुम्हाला दिलेलं आधारकार्ड बोगस तर नाही? पाहा कसं ओळखायचं?

तुमचं आधार कार्ड बनावट तर नाही? आजच तपासून पाहा.... त्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

Updated: May 27, 2022, 12:56 PM IST
तुम्हाला दिलेलं आधारकार्ड बोगस तर नाही? पाहा कसं ओळखायचं?  title=

मुंबई : आता देशात सर्वात मोठ्या प्रमाणात आयडी कार्ड म्हणून आधारकार्ड दाखवलं जातं. आधार ही ओळख आहे. मात्र हीच ओळख बनावट असेल किंवा तुम्हाला तुमचं आधार कार्ड बनावट तयार करून दिलं असेल तर? काहीवेळा बनावट आधारकार्ड तयार करून घोटाळेही केले जाऊ शकतात. 

यासाठी सुरक्षिततेचा विचार करता तुमचं आधारकार्ड बनावट आहे की नाही हे कसं ओळखाचं याच्या काही ट्रिक्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्याकडे असलेलं आधारकार्ड बनावट आहे की खरं याची माहिती तुमची तुम्हालाच मिळू शकते. 

सगळ्यात पहिल्यांदा UIDAI च्या वेबसाईटला भेट द्या. तिथे  Aadhaar Services वर क्लीक करा आणि Verify an Aadhaar Number हा पर्याय निवडा. तुम्हाला आधार कार्डवरचा तिथे नंबर अपलोड करायचा आहे. 

तुम्हाला कॅप्चर कोड येईल. तो कोड अपलोड करा. Verify Aadhaar बटनावर क्लीक करा. तिथे तुम्हाला तुमची माहिती येईल. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 3 डिजीट येतील. 

दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डवर एक QR कोड आहे. यासाठी तुम्हाला QR कोड स्कॅनरची गरज लागले. हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर तो कोड तुम्ही स्कॅन करू शकता. जर तो कोड स्कॅन झाला नाही तर आधारकार्ड बनावट आहे. 

जर तुम्ही आधारकार्ड प्लॅस्टिकचं ड्युप्लिकेट तयार करून घेतलं असेल तर त्याचा कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे ती काळजी घेणंही गरजेचं आहे. आता आधार ई केंद्रवर आपल्याला आधारकार्ड अगदी सहज उपलब्ध होतं. एवढंच नाही तर त्यामध्ये आवश्यक असणारे बदलही करता येतात.