मुंबई : आधार कार्ड पॅनकार्डप्रमाणेच मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्यासोबत लिंक करावे असा सरकारचा आदेश आहे.
३१ डिसेंबरपर्यंत बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक न झाल्यास तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन होणार नाही, त्यामुळे वेळेत आधारकार्ड लिंक करा असे आवाहन सरकारकडून दिली आहे. पण तुमचे आधारकार्ड लिंक झाले आहे की नाही ? हे तुम्हांला नेमके समजणार कसे ? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आता हे अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध आहे.
आधार कार्ड तुमच्या बॅंक खात्याशी लिंक झाले की नाही ? याची माहिती देण्यासाठी एका खास सिक्रेट कोड आहे. तुमच्या फोनमध्ये हा कोड डाएल केल्यास तुमच्या मोबाईल स्क्रिनवर सारी माहिती दिसेल. या कोडला पहणं अगदी सोप्प आहे.
तुमच्या मोबाईलवरून *99*99# कोड डायल करा. ( ही सुविधा तुम्ही आधारकार्डच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेल्या मोबाईल क्रमांकासाठी उपलब्ध आहे)
स्क्रीनवर काही सूचना येतील. त्यानुसार तुम्हांला पुढील माहितीसाठी १ क्रमांक लिहून मेसेज पाठवावा लागेल.
त्यानंतर १२ आकडी आधारकार्ड क्रमांक दिला जाईल.
तुमचा क्रमांक बॅंक खात्याशी लिंक आहे की नाही हे त्यानंतर मोबाईल स्क्रिनवर समजेल.
लास्ट अपडेटची माहितीदेखील दाखवली जाईल.
मोबाईल आणि आधार कार्डाचं लिकिंगदेखील ऑनलाईंच्या स्वरूपात करता येणं सुकर होणार आहे. 1 डिसेंबरपासून तुम्ही घरबसल्या लिकिंग करू शकता. मोबाईल आणि आधारकार्डाच्या लिकिंगसाठी ८ फेब्रुवारी २०१८ ही तारीख अंतिम असेल. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डाशी लिंक नसल्यास तो डिएक्टिव्हेट होईल.