रोबोट बनणार 'राजकारणी', 2020मध्ये लढणार निवडणूक

संशोधकांनी एका रोबोटलाच राजकारणी बनविण्याचा घाट घातला आहे. हा रोबोट 2020मध्ये उमेदवार म्हणून निवडणुकही लढविण्याची शक्यता आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 26, 2017, 08:47 PM IST
रोबोट बनणार 'राजकारणी', 2020मध्ये लढणार निवडणूक title=

मुंबई : आपल्या वैज्ञानीक संशोधनाची दिशा स्पष्ट झाली नाही. तर, कदाचित भविष्यात यंत्राचेच राज्य येण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या प्रयत्नांना यश आल्यास 2020मध्येच याची झलक दिसू शकते. कारण, संशोधकांनी एका रोबोटलाच राजकारणी बनविण्याचा घाट घातला आहे. हा रोबोट 2020मध्ये उमेदवार म्हणून निवडणुकही लढविण्याची शक्यता आहे. या रोबोटला 'व्हर्च्युअल पॉलिटिशियन' असे नाव दिले जाणार आहे.

पहिलाच बुद्धीजीवी राजकारणी रोबोट

प्राप्त माहितीनुसार, हा रोबोट न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी बनवला आहे. हा जगातला पहिलाच बुद्धिजीवी आणि राजकारणी रोबोट असणार आहे. जो शिक्षण, घर, कायदा अशा अनेक गोष्टींवर विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करू शकेल. इतकेच नाही तर, 2020मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रीक निवडणूकीत हा रोबोट उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. सॅम असे या रोबोटचे नाव असणार आहे. न्यूजीलंडच्या निक गेरिट्सन नावाच्या 49 वर्षीय उद्योगी व्यक्तिने या रोबोटची निर्मिती केली आहे.

नागरिकांच्या विविध प्रश्नांना रोबोट देणार उत्तर

दरम्यान, या रोबोटचे निर्माते गेरिट्सन यांचे म्हणने असे की, राजकारणात सध्या आणि आतापर्यंत अनेक पूर्वग्रह आहेत. जगातील अनेक देश जलवायू, परिवर्तन, समानता याबाबत अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्यामुळे या विषयांवर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हो रोबोट लकातार काम करेन. गेरिट्सन यांचे असेही म्हणने आहे की, रोबोटमधील अल्गोरिदम मानवाच्या पूर्वग्रही विचारांवर प्रभाव टाकेल. मात्र, त्याचे विचार सर्व समस्यांच्या निराकरणाचे समाधान असणार नाही. सध्या या रोबोटला 2020च्या निवडणूकीत उतरविण्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याची माहितीही गेरिट्सन देतात.