मुंबई : बॅंक अकाऊंट, पॅन कार्ड पाठोपाठ आता मोबाईलचे सीमदेखील आधारकार्डासोबत लिंक करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यासाठी प्रत्येक मोबाईल कंपनीच्या स्टोअर मध्ये लांबच लांब रांग आहे.
बायोमेट्रिकच्या मदतीने आधारकार्ड सीमकार्डासोबत लिंक करण्याची सक्ती होती. मात्र आता सरकारने यामध्ये बदल केले आहेत. UIDAI ने केलेल्या ट्विटनुसार १ डिसेंबर २०१७ पासून फिंगरप्रिंट देण्याऐवजी घरबसल्या एका ओटीपी क्रमांकावरून आधारकार्ड सीम कार्डाशी लिंक केले जाऊ शकते.
ग्राहकांमध्ये याबाबत अनेक अफवा होत्या. मात्र सरकारने हाच गोंधळ दूर करण्यासाठी खास ट्विट केले आहे.
By 1 Dec 2017, you can also choose to verify your mobile SIM with Aadhaar without giving your biometrics to Telecom Service Providers. pic.twitter.com/zcCKYbYgwP
— Aadhaar (@UIDAI) November 2, 2017
अनेक ग्राहकांना दिलासा
UIDAI ट्विट केल्यानंतर अनेक वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामुळे दिलासा मिळणार आहे. काही वयोवृद्ध लोकांचे डिटेल्स मॅच न झाल्याने सीम आणि आधार लिंक होण्यामध्ये त्रास निर्माण होत होता. सुप्रीम कोर्टानेदेखील मोबाईल आधारशी लिंक करावेच लागेल असा आदेश दिला आहे.
मोबाईल आधार कार्डाशी लिंक करण्याची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत वाढवला आहे. यादरम्यान प्रत्येक सीमकार्ड धारकाला त्याचे कार्ड आधार क्रमांकाशी जोडावेच लागेल.