close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

४ कॅमेरा सेटअप 'Honor 20' सीरीज लवकरच बाजारात

स्मार्टफोन लंडनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 

Updated: Jun 6, 2019, 09:05 PM IST
४ कॅमेरा सेटअप 'Honor 20' सीरीज लवकरच बाजारात

नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन कंपनी हुआवे (Huawei) ११ जून रोजी भारतीय बाजारात बहुचर्चित 'Honor 20' सीरीज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हुआवेचे तीन Honor 20, Honor 20 Pro, Honor 20 Lite स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. कंपनीच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. याआधी हा स्मार्टफोन लंडनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 

काय आहेत Honor 20 Pro फीचर्स

Kirin 980 7nm प्रोसेसर
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी 
डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर
६.२६ इंचीचा फुल एचडी डिस्प्ले 
२३४०*१०८० रिजॉल्यूशन पिक्सल
पंच होल सेल्फी कॅमेरा
४८ MP + १६ MP + ८ MP + २ MP असे चार रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत.

Honor 20 फीचर्स 

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी
हा स्मार्टफोन Android 9.0 Pie वर काम करतो
४८ MP + १६ MP + २ MP + २ MP चार रियर कॅमेरा सेटअप
सफायर ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.

Honor 20 Lite फीचर्स

Kirin 710 chipset प्रोसेसर 
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी
६.२१ इंच डिस्प्ले
३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
२४ मेगापिक्सल वाइड अॅंगल रियर कॅमेरा