close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

NEET परिक्षेचे निकाल जाहीर, महाराष्ट्राचा सार्थक देशात सहावा

बुधवारी (आज) NEET 2019 परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला

Updated: Jun 5, 2019, 07:05 PM IST
NEET परिक्षेचे निकाल जाहीर, महाराष्ट्राचा सार्थक देशात सहावा

मुंबई : बुधवारी (आज) NEET 2019 परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात राजस्थानच्या नलिन खंडेवालने देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने परिक्षेत 720 पैकी 701 गुणांची कमाई केली आहे. दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा येण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्राच्या सार्थक भट याने 720 पैकी 695 गुण मिळवत देशात सहावा येण्याचा मान मिळवला आहे. 

मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने टॉप केला, तिचा ऑल इंडिया रँक सातवा आहे. माधुरी रेड्डी हिने 720 पैकी 695 गुणांची कमाई केली आहे. पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले आहे. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला आहे. 

NEET 2019 या परिक्षेसाठी 15 लाख 19 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 7 लाख 97 हजार 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 5 मे रोजी NEET परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्याने कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी 20 मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांना आपले निकाल ntaneet.nic.in किंवा ntc.ac.in वर पाहता येतील. निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रेजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अ‌ॅडमिशन होणार आहे. NEET 2019चा रिझल्ट आल्यानंतर कौन्सिलिंग कमिटी एमसीसीच्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग 2019 ची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

NEET मध्ये असलेले टॉपर-
01 नलिन खंडेवाल- 701- राजस्थान 
02 भाविक बंसल- 700- दिल्ली
03 अक्षत कौशिक- 700- उत्तर प्रदेश
04 स्वास्तिक भाटिया- 696- हरियाणा
05 अनंत जैन- 695- उत्तर प्रदेश 
06 सार्थक भट- 695- महाराष्ट्र
07 माधूरी  रेड्डी जी- 695- तेलंगणा
08 ध्रुव कुशवाहा- 695- उत्तर प्रदेश 
09 मिहिर राय- 695- दिल्ली
10 राघव दुबे-691- मध्य प्रदेश