LinkedIn द्वारे नोकरी मिळवणे आता सोपे, LinkedInचे नवीन फीचर लवकरच बाजारात

ऑडिओ चॅटिंगचा (Audio Chatting) जगभरात एक नवीन ट्रेंड सुरु आहे. मॅसेज आणि फोटोंपेक्षा आता ऑडिओ चॅटींगला यूजर्स जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत.

Updated: Apr 5, 2021, 04:16 PM IST
LinkedIn द्वारे नोकरी मिळवणे आता सोपे, LinkedInचे नवीन फीचर लवकरच बाजारात title=

मुंबई : ऑडिओ चॅटिंगचा (Audio Chatting) जगभरात एक नवीन ट्रेंड सुरु आहे. मॅसेज आणि फोटोंपेक्षा आता ऑडिओ चॅटींगला यूजर्स जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. लिंक्डइनने क्लब हाऊसच्या  (Clubhouse) इनव्हॉईस-ऑडिओ चॅटचे (Invoice Audio Chat) वाढते यश पाहिल्यामुळे हे फीचर लिंक्डइन प्लॅटफॅार्मवर लाँन्च करण्याची तयारी करत आहे. त्यांना असा विश्वास आहे की, या  फीचरच्या मदतीने यूझर्सना नोकर्‍या मिळण्याची शक्यता जास्त आहे.

लिंक्डइनकडून इनव्हॉइस-ऑडिओ चॅट फीचर बाजारात

मायक्रोसॉफ्टच्या मालकीचा असलेला लिंक्डइन 200 पेक्षा जास्त देशांमधील 74 दशलक्षाहूनही अधिक यूझर्ससाठी एकाच अॅपवर काम करत आहे. टेकक्रंच या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने याची पूर्तता केली आणि त्यांच्या मते कंपनी ऑडिओ नेटवर्किंग सुविधेवर काम करत आहे.

लिंक्डइनच्या एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही तुमच्या व्यावसायिक ओळखीशी संबंधित अनोखा ऑडिओ अनुभव तयार करण्यासाठी काही चाचण्या घेत आहोत. आम्ही आमच्या सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील लोकांना संपर्क साधण्यासाठी वेगळा मार्ग देण्यासाठी लिंक्डइनच्या इतर भागांकडे, जसे इवेंट्स आणि ग्रुप्सकडे ऑडिओ कसा आणू शकतो हे पहात आहोत." लिंक्डइनच्या म्हणण्यानुसार, ते लवकरच नवीन ऑडिओ चॅट फीचरचे बीटा टेस्टिंग सुरू करणार आहे.

बीटा चाचणी सुरू

क्लब हाऊसच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल, अनेक टेक दिग्गज आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, ट्विटरने अँड्रॉइडवर ऑडिओ चॅट फीचर, Spaces ची टेस्टिंग सुरू केली आहे. ट्विटर Spaces टूल  सध्या iOS बीटावर उपलब्ध आहे.

ट्विटर Spaces अगदी ऑडिओ सोशल प्लॅटफॉर्म क्लब हाऊसप्रमाणे कार्य करतो. निवडक आयफोन्स चालविणार्‍या काही लोकांसहच चॅट रूम तयार करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. ट्विटरवर अँड्रॉइड आणि आयफोन चालवणारे सर्व लोक या चॅट रूममध्ये सामील होऊ शकतात. होस्टसह Spacesमध्ये एकाच वेळी सुमारे 11 लोक बोलू शकतात.

जर तुम्ही त्या iOS यूझर्सपैकी एक आहात ज्यांना ट्विटरने Spaces वापरण्याचा ऑप्शन दिला आहे. तर आपण त्याला पुढील मार्गाने सुरू करू शकता. ट्वीट लिहिणारे बटण दाबून ठेवा, त्यानंतर उघडलेल्या पर्यायांपैकी Spaces ऑप्शन निवडा. त्याशिवाय आपण फ्लीट्समधील आपल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करून Spacesचा पर्याय निवडू शकता. आपण आपल्या Spacesचे नाव आणि डेस्क्रिप्शन लिहू शकता आणि मग गप्पां दरम्यान ते बदलू देखील शकता.