Vikram-S Missile: जगभर गाजलेल्या मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजे (MOM) मुळे इस्त्रोची (ISRO) नवी ओळख निर्माण झाली. त्यानंतर 103 उपग्रह अवकाशात पाठवून इस्त्रोने नवा विक्रम देखील रचला होता. त्यानंतर आता इस्त्रोचा आणखी एक विक्रम खराब हवामानामुळे रखडला आहे. सर्वांना प्रतिक्षा असलेलं देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम-एस (vikram-s launch delayed) लाँच होण्यास थोडा वेळ लागेल. (india first private rocket vikram-s launch delayed now set to launch on 18 nov)
विक्रम-एस रॉकेट (India's first private rocket) आज म्हणजेच 15 नोव्हेंबरला लॉन्च होणार होतं, परंतु आता ते 18 नोव्हेंबरला लॉन्च केलं जाणार आहे. कंपनीने हवामानाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. Vikram-S प्रायव्हेट रॉकेट हैदराबादच्या स्टार्टअप कंपनी स्कायरूट एरोस्पेसने तयार केलं आहे आणि हे देशातील पहिले खाजगी रॉकेट आहे, जे लॉन्च केलं जाणार आहे.
रॉकेटची झलक दाखवताना स्कायरूट एरोस्पेसने (Skyroot Aerospace) आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केलं. प्रक्षेपण आज होत नसल्याची त्यांनी दिली. खराब हवामानामुळे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता लॉन्च (Vikram-S Launch Date) होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
There it is!
Catch a glimpse of our Vikram-S at the rocket integration facility at Sriharikota, as it gets ready for the momentous day. Weather seems great for the launch on 18 Nov 11:30 AM.#Prarambh #OpeningSpaceForAll pic.twitter.com/b0nptNlA1N— Skyroot Aerospace (@SkyrootA) November 14, 2022
दरम्यान, 2020 मध्ये केंद्र सरकारने अवकाश क्षेत्रात खासगी उद्योगांचा प्राधान्य दिलं. त्यानंतर स्कायरूट कंपनीने देशातील आपलं पहिलं रॉकेट Vikram-S तयार केलं. नोव्हेंबरमध्ये रॉकेट इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता रॉकेट लॉचिंग साठी सज्ज झालं होतं. मात्र, खराब वातावरणामुळे प्रक्षेपण रखडलं आहे.